सखी मंडळाच्या प्रदर्शनामुळे उद्योजिकांना मिळाली उत्पादनांचे सादरीकरण व विक्रीची संधी

अमृतसखी दर्शना जाब्रस यांनी भेट देऊन दिली अमृत संस्थेची माहिती

सखी मंडळाच्या प्रदर्शनामुळे उद्योजिकांना मिळाली उत्पादनांचे सादरीकरण व विक्रीची संधी मुख्य फोटो
सखी मंडळाच्या प्रदर्शनामुळे उद्योजिकांना मिळाली उत्पादनांचे सादरीकरण व विक्रीची संधी अतिरिक्त फोटो

नागपूर : येथील अमृत कार्यालयात सखी मंडळातर्फे आयोजित भव्य उद्योजिका प्रदर्शनाला अमृतसखी दर्शना जाब्रस यांनी भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती स्टॉलधारक व उद्योजिकांना दिली. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, कपडे, दागिने आदींचा समावेश असून, स्थानिक उद्योजिकांना आपल्या उत्पादनांचे सादरीकरण व विक्री करण्याची संधी मिळाली आहे.

अमृतसखी दर्शना जाब्रस यांनी अमृत संस्थेअंतर्गत उपलब्ध असलेले विविध शासकीय लाभ, आर्थिक साह्य व प्रशिक्षण संधींबाबत माहिती देऊन उद्योजिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे उद्योजिकांमध्ये अमृत संस्थेच्या योजनांबाबत जागरूकता निर्माण होऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 409 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 409 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words