मोबाइल फिल्म-मेकिंग बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये संस्थेच्या योजनांबद्दल अधिक जागरूकता तयार होण्यास मदत
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने मोबाइल फिल्म मेकिंग प्रशिक्षण बॅचच्या विद्यार्थ्यांना अमृत दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. अमृत ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवणारी संस्था असून, राज्यातील खुल्या प्रवर्गातील युवक, महिला व दुर्बल घटकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नव्या कौशल्यांचा विकास व प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अमृत सातत्याने कार्यरत आहे.
वितरण करण्यात आलेल्या अमृत दिनदर्शिकेमध्ये अमृत योजना, विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम, मार्गदर्शक माहिती, तसेच प्रेरणादायी संदेश यांचा समावेश असून, ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. दिनदर्शिका वितरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमृत संस्थेच्या कार्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली असून, प्रशिक्षणाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून “AMRUT – Skill Today, Success Tomorrow” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचत असल्याचे या उपक्रमातून दिसून येते.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment