अमृत संस्थेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांसाठी आरी वर्क, ब्युटी पार्लर व ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रम

घरबसल्या उपलब्ध होऊ शकतो रोजगाराचा मार्ग

अमृत संस्थेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांसाठी आरी वर्क, ब्युटी पार्लर व ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
अमृत संस्थेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांसाठी आरी वर्क, ब्युटी पार्लर व ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रम अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महिलांच्या स्वावलंबनासाठी अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुढाकाराने आरी वर्क, ब्युटी पार्लर व इमिटेशन ज्वेलरी प्रशिक्षणाची सुवर्णसंधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. आजच्या बदलत्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेअंतर्गत अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष व्यावसायिक प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत आरी वर्क, ब्युटी पार्लर आणि इमिटेशन ज्वेलरी या रोजगारक्षम व मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विशेषतः खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
आरी वर्क ही कापडावर सुईसारख्या आरीने केली जाणारी नक्षीकामाची कला आहे. कपडे, दुपट्टे, साड्या, लेहेंगा, ब्लाउज, पडदे, उशांचे कव्हर इत्यादींसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो तसेच घरातील सजावटीसाठी आकर्षक व कलात्मक डिझाइन तयार करण्याचे कौशल्य यामध्ये शिकवले जाणार आहे.
ब्युटी पार्लर प्रशिक्षणात मेकअप, स्किन केअर, हेअर स्टायलिंग यांसह सौंदर्यसेवेतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल. इमिटेशन ज्वेलरी प्रशिक्षणातून घरबसल्या आकर्षक दागिने तयार करून व्यवसाय उभारण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी प्रशिक्षकांकडून थेट मार्गदर्शन, कमी खर्चात व्यावसायिक कौशल्ये मिळवण्याची संधी आणि प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी. अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची, कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची आणि आत्मविश्वासाने समाजात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.

स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत स्वायत्त संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्कर रोडे - 94032 00606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

रामेश्वर साळुंके - 80100 95930
अमृतमित्र

मंजू कुलकर्णी - 94045 93726
अमृतसखी

ऋचा शर्मा - 77090 80073
अमृतसखी

पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 10:13 PM News publication time | Views: 766 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 10:13 PM News publication time | Views: 766 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words