लक्ष्यित गटाकडून स्वागत
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृत संस्थेने अनोखी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येत आहे. या दिनदर्शिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
'योजनांची पूर्ण माहिती असलेली अशा प्रकारची कोणतीही दिनदर्शिका याआधी या कार्यालयात कोणीही दिली नव्हती. यामुळे आम्हालासुद्धा अमृतच्या सर्व योजनांची माहिती सुलभरीत्या मिळेल व आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवू शकू,' अशी प्रतिक्रिया कणकवली तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांकडूनही या दिनदर्शिकेचे स्वागत होत आहे. या दिनदर्शिकेत तिथी, सण इत्यादींची ठळक नोंद असून, ती एप्रिल २०२७पर्यंतची म्हणजे १६ महिन्यांची आहे.
श्रीराम केळकर
सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक - अमृत
9112228760, 8554059044
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment