अमृत संस्थेचे लोकाभिमुख कार्य अनुकरणीय : आमदार प्रकाश सोळंके यांचे कौतुकोद्गार

पुढील काळात अमृत संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन

अमृत संस्थेचे लोकाभिमुख कार्य अनुकरणीय : आमदार प्रकाश सोळंके यांचे कौतुकोद्गार मुख्य फोटो
अमृत संस्थेचे लोकाभिमुख कार्य अनुकरणीय : आमदार प्रकाश सोळंके यांचे कौतुकोद्गार अतिरिक्त फोटो

माजलगाव (जि. बीड) : 'खुल्या प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे उभारण्यात आलेली अमृत ही चळवळ अत्यंत महत्त्वाची असून, अमृत संस्था जे विधायक, पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करत आहे, ते निश्चितच अनुकरणीय आहे,' असे प्रतिपादन माजलगावचे आमदार व माजी मंत्री प्रकाश (दादा) सोळंके यांनी केले. अमृत संस्थेचे जालना जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी व अमृतमित्र सुमित धिरडे यांनी अलीकडेच सोळंके यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांना अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीची व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अमृत संस्था महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अशा समाजघटकांसाठी कार्यरत आहे, ज्यांना अन्य कोणत्याही शासकीय महामंडळाचा किंवा स्वतंत्र विकास संस्थेचा थेट लाभ मिळत नाही. ब्राह्मण, मारवाडी, माहेश्वरी, गुजराती, सिंधी आदी समाजघटकांतील युवक-युवतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगारासाठी आर्थिक साह्य, उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन, उद्योजकता विकास, तसेच सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या सर्व उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजाच्या गरजेनुसार खुल्या प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे उभारण्यात आलेली ही चळवळ अत्यंत महत्त्वाची असून, अमृत संस्था जे विधायक, पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करत आहे ते निश्चितच अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळात अमृत संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य जयसिंग सोळंके, कल्याण आबुज, मनोज फरके यांच्यासह विविध क्षेत्रांतील इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही अमृत संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, अशा संस्थांमुळे समाजातील युवकांना दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम हे केवळ आर्थिक साह्यापुरते मर्यादित न राहता, युवक-युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे वळवणारे ठरत आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद अमृत संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरत आहे. खुल्या प्रवर्गातील समाजघटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या कार्याला राजकीय व सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे यावरून दिसत आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 11:14 AM News publication time | Views: 646 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 11:14 AM News publication time | Views: 646 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words