विशेष बैठकीचे आयोजन
यवतमाळ : येथील कृषिनगर परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, लक्ष्यित गटातील घटकांसाठी या संस्थेतर्फे विविध योजना राबवल्या जातात.
अमृत संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने निःशुल्क बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. त्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. लक्ष्यित गटातील महिला या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माहिती घेतल्यावर बेकरी प्रशिक्षण घेण्याची तयारी अनेक महिलांनी दर्शवली.
या बैठकीला एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रूपेश हिरुळकर, तसेच अमृत संस्थेचे यवतमाळ जिल्हा उपव्यवस्थापक कामेश राखे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व, स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरणाबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क :
परीक्षित कमलकिशोर शर्मा - ९११२२२७६३३
यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : स्वामी समर्थ विहार,
पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए १,
अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment