उत्तम प्रशिक्षण घेऊन लाभार्थ्यांनी यशस्वी उद्योजक व्हावे : सागर भोपे
अहिल्यानगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या मोबाइल फिल्म-मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ अहिल्यानगरमध्ये झाला. अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर सर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
या वेळी शार्प मल्टीमीडियाचे प्रणव लगड आणि अमृतचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी प्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. 'अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतील यशस्वी उद्योजक तयार होण्यासाठी मोबाइल फिल्म-मेकिंग कोर्सच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी चांगले प्रशिक्षण घ्यावे व यशस्वी उद्योजक व्हावे,' अशी इच्छा अमृतचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी व्यक्त केली.
सृष्टी डांगे, देवांग कुलकर्णी, सार्थक व्यास, वृषाली देशपांडे, निखिल झुंझारे, सुजल जुणजारे, अभिषेक वडकर, शरद क्षीरसागर, यश देशपांडे, सायली कुलकर्णी, सुधीर नगरकर, पूर्वी कमलापूरकर, समर्थ शेटे, सौरभ जोजार, वैभव कुलकर्णी, गौरी कुलकर्णी हे लाभार्थी यात सहभागी होऊन प्रशिक्षण घेत आहेत.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
कार्यालय पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment