दादर येथील मारुती मंदिरापासून सुरुवात
मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी एक खास दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे मुंबईत विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. दादर येथील पाटील मारुती मंदिरापासून त्याची सुरुवात करण्यात आली. या मंदिरातील गुरुजी श्रीकृष्ण बोले यांना दिनदर्शिका देऊन त्याची सुरुवात करण्यात आली. अमृतच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि भाविकांपर्यंत प्रचार व प्रसार व्हावा म्हणून दिनदर्शिका मंदिरात लावण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. या दिनदर्शिकेचे स्वागत होत आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment