पन्हाळा तालुक्यात अमृत संस्थेच्या प्रसारासाठी होणार प्रभावी उपयोग
कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे यशवंत आयुर्वेद कॉलेजला भेट दिली. यशस्वी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त सौ. विनिता जयंत पाटील, तसेच श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. जयंत प्रदीप पाटील यांची भेट या वेळी घेण्यात आली.
त्यांना अमृत संस्थेची आणि योजनांची माहिती देण्यात आली. त्यांच्या यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून अमृत कौशल्यविकास उद्यम प्रशिक्षण राबवता येईल, असे त्यांना सुचवण्यात आले. त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील पन्हाळा तालुक्यातील व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि कौशल्यविकास उद्यम प्रशिक्षण चांगल्या सक्षम पद्धतीने जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी या भेटीचा उपयोग होणार असल्याचे अमृत कौशल्य विकास उद्यम प्रशिक्षण देणारे राजन डांगरे यांनी व्यक्त केला. डांगरे यांच्या हस्ते अमृत दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment