ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ अमृत संस्थेच्या उपक्रमांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देणार वर्ग

संस्थेच्या उपक्रमांचे केले कौतुक

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ अमृत संस्थेच्या उपक्रमांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देणार वर्ग मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण (जि. सातारा) : येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ यांनी अमृत संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि साहित्य क्षेत्रात दीर्घ काळ सक्रिय योगदान असलेल्या श्री. बेडकीहाळ यांनी अमृत संस्थेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. अमृत संस्थेला कोणतेही शैक्षणिक, सामाजिक किंवा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करायचे असल्यास त्यांच्या शैक्षणिक संस्थेतून एक वर्ग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे सामाजिक, शैक्षणिक, जनजागृतीपर व आर्थिक सक्षमीकरणाचे उपक्रम समाजातील सर्वसामान्य नागरिक, युवक आणि गरजू घटकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे श्री. बेडकीहाळ यांनी नमूद केले. “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असे कार्य करणाऱ्या संस्थांची आज नितांत गरज आहे. अमृत संस्था ही केवळ योजनांची माहिती देणारी संस्था नसून, प्रत्यक्ष समाजपरिवर्तनासाठी काम करणारी चळवळ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी अमृत संस्थेची दिनदर्शिका त्यांना देण्यात आली. या दिनदर्शिकेमध्ये विविध शासकीय योजना, सामाजिक संदेश, तसेच जनहिताची माहिती समाविष्ट असून ती सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले. श्री. बेडकीहाळ यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे अमृत संस्थेच्या उपक्रमांना भविष्यात नवे बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 11:58 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 11:58 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words