उद्योग उभारण्याचे आवाहन
दहिसर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक प्रणय तीर्थकर यांनी अमृत संस्थेच्या योजनांविषयी माहिती देण्यासाठी दहिसर या मुंबई उपनगरामधील डॉक्टर हेडगेवार अभ्यासिकेला भेट दिली. तेथील युवकांची भेट घेऊन त्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. अमृत कौशल्य, अमृत ड्रोन पायलट, अमृत सूर्यमित्र या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी प्रशिक्षित होऊन स्वतंत्र उद्योग उभारावा, असे आवाहन तीर्थकर यांनी केले. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment