'अमृत'च्या दिनदर्शिकेचे गंगापूर तालुक्यात स्वागत

योजनांची माहिती देऊन करण्यात आले वाटप

'अमृत'च्या दिनदर्शिकेचे गंगापूर तालुक्यात स्वागत मुख्य फोटो
'अमृत'च्या दिनदर्शिकेचे गंगापूर तालुक्यात स्वागत अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी अमृत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंखे यांनी गंगापूर तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन अमृत योजनेची माहिती देऊन दिनदर्शिकेचे वाटप केले.
गंगापूर येथे अतुल कुलकर्णी आणि कौशिक जोशी यांना अमृतची दिनदर्शिका देण्यात आली. त्यानंतर बाजार वडगाव येथे लक्ष्यित गटातील महिलांना अमृत संस्थेची माहिती सांगून दिनदर्शिका देण्यात आली. यानंतर लासूर स्टेशन येथे गणेश देवा जोशी आणि कैलास शर्मा यांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली. या वेळी लासूर स्टेशन येथील मारवाडी, ब्राह्मण समाजातील मान्यवर व्यक्तींच्या भेटी घेण्यात आल्या. लासूर स्टेशन येथेच लक्ष्यित गटातील महिलांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत संस्थेची माहिती देण्यात आली आणि दिनदर्शिका वाटप करण्यात आले. लक्ष्यित गटातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी दिनदर्शिकेचा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

संपर्क : अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 10:27 PM News publication time | Views: 246 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 10:27 PM News publication time | Views: 246 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words