वाशिममध्ये अमृत संस्थेतर्फे निःशुल्क संगणक प्रशिक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आठ जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

वाशिममध्ये अमृत संस्थेतर्फे निःशुल्क संगणक प्रशिक्षण मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील घटकांसाठी विविध प्रकारचे कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क राबवले जातात. त्याच प्रकारचा संगणक प्रशिक्षण कार्यक्रम वाशिममध्ये राबवला जाणार असून, त्यासाठी आठ जानेवारीपर्यंत अर्ज करायचे आहेत.

२१व्या शतकात जीवन धावपळीचे झाले आहे. सोबतच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतात. आजचे युग कम्प्युटरचे आहे. कम्प्युटरवर आधारित व्यवसायस ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसत आहेत. याकडे तरुणांनी उद्योग म्हणून पाहावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी करतात. ग्रामीण भागात या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. म्हणूनच वाशिम शहरात लवकरच संगणक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला जात आहे. लक्ष्यित गटातील युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे, आवाहन अमृत संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी आणि जिल्हा उपव्यवस्थापक रोहित देशमुख यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 07:41 PM News publication time | Views: 87 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 07:41 PM News publication time | Views: 87 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words