जळगाव जिल्ह्यात दिनदर्शिका वितरणाचा प्रारंभ
जळगाव : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अमृत दिनदर्शिकेच्या वितरणाचा जळगाव जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती सर्वदूर पोहोचण्यासाठी म्हणून संस्थेने एक नवीन प्रयोग म्हणून अमृत दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. अमृत संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यालयात दिनदर्शिका वितरणाचा प्रारंभ झाला.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त महामंडळाचे वसुली निरीक्षक योगेश पाटील, तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ वसुली निरीक्षक गोपाल थाटे यांनी अमृत संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी अमृत संस्थेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी त्यांना अमृत दिनदर्शिका दिली. 'अमृत संस्थेने फारच स्तुत्य उपक्रम राबवला आहे. लाभार्थी आमच्या कार्यालयात येतात, त्या वेळी सांगतात, की अमृतच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आपण हे दिनदर्शिकेद्वारे आणखी अधोरेखित केले आहे,' असे त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दिनदर्शिका पूर्णतः मराठीत असून सर्व तिथी वगैरे ठळक शब्दांत दिल्या आहेत. अमृतच्या सर्व योजनांची सचित्र माहितीही त्यात देण्यात आली आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment