लक्ष्यित गटातील व्यक्तींना निःशुल्क प्रशिक्षण घेऊन व्यावसायिक होण्याची सुवर्णसंधी
कारंजादत्त (वाशिम) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे वाशिम जिल्ह्यातील कारंजादत्त येथे १० जानेवारीपासून आयात-निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी निःशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.
भारत देशाला विकसित करण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलणारा विषय म्हणजे निर्यात. वेगवेगळ्या जीवनावश्यक गोष्टी तयार करणारा देश म्हणून जगभरात भारताची ओळख होत आहे. केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजनांमार्फत नवनवीन स्टार्टअप देशात सुरू होत आहेत. त्यातून तयार झालेली उत्पादने परदेशात निर्यात केली जातात. काही आवश्यक वस्तूंची आयात करावी लागते. जितकी जास्त निर्यात होईल तितक्या लवकर आपण विकसित होऊ. त्यावरच भारताचा विकासदर अवलंबून आहे. अधिकाधिक निर्यात व्हायला हवी आणि निर्यात हासुद्धा एक प्रकारचा रोजगार आहे. हा रोजगार करू इच्छिणाऱ्यांनी अमृत संस्थेच्या आयात-निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. त्यातून स्वतः समृद्ध व्हावे व देशालाही समृद्ध करावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment