बेरोजगार युवक-युवतींसाठी रिसोडमध्ये निःशुल्क बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम

अमृत संस्थेतर्फे आयोजन; १० जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बेरोजगार युवक-युवतींसाठी रिसोडमध्ये निःशुल्क बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

रिसोड (जि. वाशिम) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि युवकांमधून उद्योजक घडवण्यासाठी काम करणारी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था रिसोड शहरात बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली ही संस्था असून, लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. १५ जानेवारीपासून रिसोडमध्ये बेरोजगार युवक व युवतींसाठी बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १० दिवसांचा असून, त्यासाठी १० जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःला घडवावे, असे आवाहन अमृत संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्न दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो, दहावीची मार्कशीट

अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words