अकोल्यातील अमृत वर्गात डॉ. प्रवीण देशपांडे यांनी सादर केली 'स्वदेशी' या विषयावरची बोधकथा
अकोला : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अमृत वर्ग उपक्रमाला अकोला जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि अति विशेष उपचार रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर प्रवीण देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून 'स्वदेशी' या विषयावर आधारित एक प्रेरणादायी बोधकथा सादर केली.
डॉ. देशपांडे यांनी आपल्या कथेमधून स्वदेशी विचारांचे महत्त्व, आत्मनिर्भरतेची गरज तसेच देशी उत्पादनांचा स्वीकार का आवश्यक आहे, हे अतिशय सोप्या व प्रभावी शब्दांत विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या कथेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी चळवळीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.
या वेळी त्यांनी अमृत वर्गातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शिस्त, त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आत्मविश्वास यांचे विशेष कौतुक केले. अमृत वर्गामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मान्यवर व्यक्तींच्या अशा भेटी व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वैचारिक प्रेरणा मिळत असून, समाजात जागरूक व जबाबदार नागरिक घडवण्याच्या अमृत वर्गाच्या समाजोपयोगी भूमिकेला अधिक बळ मिळत आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment