अमरावतीतील फायबर वर्क व्यावसायिक नितीन कोळेश्वर यांना मिळणार लाभ
अमरावती : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था लक्ष्यित घटकांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे अमरावती येथील फायबर वर्क व्यवसाय करणारे नितीन कोळेश्वर यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू होणार आहे. व्यवसायवाढीच्या उद्देशाने त्यांनी आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून, त्या कर्जावरील व्याजपरतावा अमृत संस्थेमार्फत मंजूर करण्यात आला आहे. अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांच्या हस्ते त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले.
नितीन कोळेश्वर यांनी फायबर वर्क व्यवसाय अधिक सक्षमपणे उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी अमृत संस्थेकडे व्यावसायिक वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेअंतर्गत अर्ज सादर केला होता. योजनेसाठी पात्र ठरल्याने आता वैयक्तिक कर्जावरील व्याजपरताव्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या व्याजपरताव्यामुळे नितीन कोळेश्वर यांच्या फायबर वर्क व्यवसायाला मोठा हातभार लागणार असून, त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यास बळ मिळणार आहे.
.........
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती
9112227673, 9112227635, 7249451152
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment