योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणार
वाशिम : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे योजनांची माहिती देणारी अमृत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच तहसील कार्यालयांमध्ये अमृत संस्थेच्या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील अधिकाऱ्यांना अमृत संस्थेबद्दल सविस्तर माहिती आणि अमृत संस्थेतर्फे जिल्ह्यात घेतले जाणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment