अमृत दुर्गोत्सवाच्या विश्वविक्रमाबद्दल वाशिमच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अभिनंदन

श्रीमती वैशाली देवकर यांना देण्यात आली अमृत संस्थेची दिनदर्शिका

अमृत दुर्गोत्सवाच्या विश्वविक्रमाबद्दल वाशिमच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अभिनंदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे योजनांची माहिती देणारी अमृत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. ही दिनदर्शिका वाशिमच्या उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती वैशाली देवकर यांना देण्यात आली. अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहितीही त्यांना देण्यात आली. अमृत संस्थेच्या दुर्गोत्सवाचा विश्वविक्रम झाल्याबद्दल श्रीमती देवकर यांनी अभिनंदन केले. त्या निमित्ताने ही संस्था खेडोपाडी पोहोचली, असे सांगून देवकर यांनी जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांचे अभिनंदन केले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 11:26 AM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 11:26 AM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words