वाशिमच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
वाशिम : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या अनोख्या दिनदर्शिकेचे वितरण केले जात आहे. वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हा दंडाधिकारी विश्वनाथ घुगे यांना अमृत दिनदर्शिका देण्यात आली. योजनांची माहिती देण्यासाठी दिनदर्शिका या संकल्पनेचे श्री. घुगे यांनी कौतुक केले.
राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लोकांपर्यंत प्रसार-प्रचार व्हावा यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत असते. अमृत संस्थेने एका वेगळ्या प्रकारे दिनदर्शिकेचा अभिनव उपक्रम राबवला. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजना सहज पोहोचणार आहेत. लक्ष्यित गटातील व्यक्तींनी अमृत संस्थेच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश अरविंद जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत वाशिम जिल्हा कार्यालय,
जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, वाशिम
...........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 1 Comments
SANKET SURYAKANT SATHE
Khupch chaan ..!
Write a Comment