नांदगावात २४ ऑक्टोबरला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ – भव्य आनंद नगरी’ महोत्सव

सप्तरंगी सखी मंच व अमृतचा संयुक्त उपक्रम; दिवाळी खरेदीसाठी नागरिकांना सुवर्णसंधी.

नांदगावात २४ ऑक्टोबरला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ – भव्य आनंद नगरी’ महोत्सव मुख्य फोटो
मुख्य फोटो

नांदगाव : दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नांदगाव येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ – भव्य आनंद नगरी व विक्री महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. सप्तरंगी सखी मंच आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी गुप्ता लॉन्स, नांदगाव, जि. नाशिक येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ज्वेलरी, आकर्षक बांगड्या, हँडमेड दागिने, साड्या, ड्रेसेस, आयुर्वेदिक व हर्बल उत्पादने, घरगुती सजावटीच्या वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती मसाले तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी व आकर्षक वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश महिला उद्योजक, लघुउद्योजक आणि गृहउद्योगांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना प्रसिद्धी मिळावी, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार व विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार असून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. नांदगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह या भव्य आनंद नगरीला आवर्जून भेट द्यावी, दिवाळीच्या खरेदीचा आनंद घ्यावा आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवाची माहिती - दिनांक: शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ - स्थळ: गुप्ता लॉन्स, नांदगाव, जि. नाशिक - वेळ: दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत - प्रवेश: सर्वांसाठी विनामूल्य - संपर्क: ९८६०२५२१७६, ९३२५५१४७०४, ९६६५६९२६७६, ९४२३४७६९२९ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहेत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Ajinkya Kannal News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 11:55 AM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Ajinkya Kannal News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 11:55 AM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement