अमृत संस्थेकडून गोंदियात नि:शुल्क बेकरी व्यवसाय प्रशिक्षण

युवक-महिलांना स्वावलंबी होण्याची सुवर्णसंधी

अमृत संस्थेकडून गोंदियात नि:शुल्क बेकरी व्यवसाय प्रशिक्षण मुख्य फोटो
अमृत संस्थेकडून गोंदियात नि:शुल्क बेकरी व्यवसाय प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

गोंदिया : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे गोंदिया जिल्ह्यात निःशुल्क बेकरी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम संस्थेच्या लक्ष्यित गटातील युवक, महिला व बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराची नवी दिशा देणारा ठरणार आहे.
या प्रशिक्षणाद्वारे लाभार्थ्यांना बेकरी व्यवसायाचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण, आधुनिक पद्धती, कच्चा माल व्यवस्थापन, पॅकिंग, ब्रँडिंग व विक्रीचे तंत्र शिकवले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक लाभार्थ्यांना पीएमईजीपी किंवा सीएमईजीपी योजनेअंतर्गत कर्ज व शासकीय अनुदान मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कमी भांडवलात सुरू होणारा बेकरी व्यवसाय ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेला उद्योग असून, योग्य नियोजन केल्यास महिन्याला ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतही उत्पन्न मिळवणे शक्य होऊ शकते.
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे युवक व महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून, आर्थिक स्वावलंबन आणि रोजगारनिर्मिती साध्य होणार आहे. या प्रशिक्षणासाठी १८ ते ६० वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी अमृत संस्थेच्या गोंदिया कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क :
कार्तिक तिवारी - 91112228776
गोंदिया जिल्हा व्यवस्थापक, अमृत
.......
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 12:18 AM News publication time | Views: 88 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 12:18 AM News publication time | Views: 88 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words