अमृत संस्थेच्या साथीने स्वप्नांना मिळाले बळ

छत्रपती संभाजीनगरमधील सचिन किंबहुने यांना मिळाला १४,१८८ रुपयांचा व्याजपरतावा

अमृत संस्थेच्या साथीने स्वप्नांना मिळाले बळ मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या साथीने स्वप्नांना मिळाले बळ अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : आजच्या काळात व्यवसाय किंवा रोजगारासाठी कर्ज घेणे अनेकांसाठी गरजेचे झाले आहे; मात्र कर्जासोबत येणारे व्याज अनेकदा आर्थिक तणाव निर्माण करते. अशा वेळी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठा आधार ठरत आहे.
या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक अडचणीतून मार्ग काढणारे सचिन किंबहुने हे याचे उत्तम उदाहरण आहेत. व्यवसायासाठी त्यांनी देवगिरी बँकेकडून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यासाठी अर्ज केला. आवश्यक कागदपत्रे आणि वेळेत केलेल्या प्रक्रियेमुळे त्यांना आतापर्यंत १४ हजार १८८ रुपयांचा व्याजपरतावा मिळाला.
या आर्थिक मदतीमुळे त्यांचा कर्जावरील ताण कमी झाला असून, व्यवसायाला स्थैर्य मिळाले आहे. याबद्दल अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंके यांनी भेट घेऊन सचिन किंबहुने यांचे अभिनंदन केले. या वेळी अमृत योजनेचा लाभ इतर गरजूंपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सचिन किंबहुने यांनी महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेबाबत समाधान व्यक्त करून सांगितले, की 'ही योजना माझ्यासाठी फारच उपयुक्त ठरली आहे. पुढील काळात मी ‘अमृत मित्र’ म्हणून काम करीन आणि या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार आहे.'

अमृत संस्थेविषयी...
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतच्या संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको,
हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर- ४३१००९

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 210 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 03-01-2026 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 210 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

S
SANKET SURYAKANT SATHE
03-01-2026 04:18 PM

nice ...!

S
SANKET SURYAKANT SATHE
03-01-2026 10:17 AM

nice ...!

Write a Comment
0 / 50 words