सेवा सप्ताहानिमित्त कोल्हापुरात कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कॉलेज मध्ये नेत्रतपासणी शिबिर

सेवा सप्ताहानिमित्त कोल्हापुरात कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कॉलेज मध्ये नेत्र तपासणी शिबिर
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला कॉलेज प्रशासन व विद्यार्थी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवा सप्ताहानिमित्त कोल्हापुरात कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन  कॉलेज मध्ये नेत्रतपासणी शिबिर मुख्य फोटो
सेवा सप्ताहानिमित्त कोल्हापुरात कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन  कॉलेज मध्ये नेत्रतपासणी शिबिर अतिरिक्त फोटो

सेवा सप्ताहानिमित्त कोल्हापुरात कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कॉलेज मध्ये नेत्र तपासणी शिबिर सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला कॉलेज प्रशासन व विद्यार्थी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्था आणि आकाशदिप नेत्रालय राजारामपूरी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताहानिमित्त कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कॉलेज कोल्हापूर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात कॉलेजमधील १०० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांच्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्या दृष्टीसंदर्भातील अडचणींची माहिती घेण्यात आली. नियमित नेत्र तपासणी, डोळ्यांची योग्य काळजी आणि आरोग्यविषयक सवयी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख कोल्हापूर व गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे प्रशासक श्री डॉ चंद्रकांत परुळेकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे चेअरमन आर्किटेक्चर श्री विजय गजबर सर हे होते तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अधिकारी अमृत जिल्हा कार्यालयाचे अधिकारी कॉलेज प्रशासनाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा अमृत संस्था व आकाशदिप नेत्रालय आणि कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कॉलेज कोल्हापूर यांचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिल्यास भविष्यातील अनेक दृष्टीविषयक समस्या टाळता येऊ शकतात, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी कला प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कॉलेजचे क्लार्क किरण कुलकर्णी, आकाशदिप नेत्रालय कोल्हापूरचे, विपणन अधिकारी डॉ. गिरिजा खळदकर, श्री. अक्षय देसाई व अमृत संस्थेचे जिल्हा समन्वयक प्रशांत जोशी, उपजिल्हा समन्वयक अभिजित कुलकर्णी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे लक्ष्मण मोरे आणि दयानंद डोंगर साहेब यांनी विशेष सहकार्य केले. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून “सेवा हीच सामाजिक बांधिलकी” या भावनेचा प्रत्यय आला. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपण्याचा व संवेदनशीलतेचा आदर्श ठरला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228764 संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: prashant joshi News publisher name | Date: 17-10-2026 News publication date | Time: 04:46 PM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: prashant joshi News publisher name | Date: 17-10-2026 News publication date | Time: 04:46 PM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement