‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची अमृत जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी घेतली भेट!

‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाचा जिल्ह्यात प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी श्रीमती संजीवनी जाधव यांची भेट घेतली. यावेळी उपक्रमाचं पत्र देऊन सविस्तर माहिती सांगण्यात आली. तसेच उपक्रमाची बातमी प्रसिद्ध करण्यासाठी ई-मेलही पाठविण्यात आला. विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहासाची ओळख व्हावी आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची अमृत जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी घेतली भेट! मुख्य फोटो
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची अमृत जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी घेतली भेट! अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : आपल्या महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा नव्या पिढीला समजावा, विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांची आवड निर्माण व्हावी आणि दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून या उपक्रमात सहभागी व्हावं, यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता यावं, यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी श्रीमती संजीवनी जाधव यांची भेट घेतली.

यावेळी अक्षय लंबे यांनी त्यांना ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाचं पत्र दिलं. तसेच हा उपक्रम नेमका कशासाठी राबविण्यात येत आहे, विद्यार्थ्यांना यातून काय शिकायला मिळणार आहे आणि गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती कशी होणार आहे, याची सविस्तर माहिती दिली. उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी बातमी प्रसिद्ध करण्याची विनंतीही करण्यात आली.

दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी केवळ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार न करता, त्यामागचा इतिहासही जाणून घ्यावा आणि आपल्या ऐतिहासिक ठेव्याबद्दल अभिमान बाळगावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची ओळख करून देण्यासोबतच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अमृतच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 05:42 PM News publication time | Views: 27 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 05:42 PM News publication time | Views: 27 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement