अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीत राठोड यांची भेट घेऊन ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावं, अशी विनंती केली. विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या सुट्टीत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून विद्यार्थ्यांना आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावं, यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीत राठोड यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान अक्षय लंबे यांनी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाची संपूर्ण माहिती उपजिल्हाधिकारी संगीत राठोड यांना दिली. तसेच त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी या उपक्रमात सहभागी व्हावं आणि उपक्रमाला सहकार्य करावं, अशी विनंती करण्यात आली.
आपल्या महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाची माहिती नवीन पिढीला व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी आणि गड-किल्ल्यांच्या जतनाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून अधिकाधिक शाळा, विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयांनी सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, यासाठी अमृतच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment