‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्री. जनार्दन विधाते यांची भेट घेतली. यावेळी उपक्रमाचे पत्र देऊन त्यामागचा उद्देश आणि उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गड-किल्ले तयार करण्याची उत्सुकता असते. याच आवडीला आपल्या इतिहासाची जोड मिळावी, मुलांना महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांची माहिती व्हावी आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्याची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची माहिती जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवून त्याचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी अमृतचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्री. जनार्दन विधाते यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान अक्षय लंबे यांनी श्री. विधाते यांना ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाचे पत्र दिले. तसेच हा उपक्रम नेमका कशासाठी राबविण्यात येत आहे, त्यामागचा उद्देश काय आहे आणि विद्यार्थ्यांना यातून आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख कशी होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आहेत. या गड-किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात आणि त्यातून इतिहासाची गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
विद्यार्थ्यांच्या हातून गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती उभ्या राहाव्यात आणि त्यांच्या मनात आपल्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, यासाठी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून अमृत प्रयत्नशील आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment