बालाघाट पब्लिक स्कूलमध्ये ‘अमृत वर्ग’ सुरू होणार; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणार चालना

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या पुढाकारातून तेलगाव येथील बालाघाट पब्लिक स्कूलमध्ये ‘अमृत वर्ग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. सुमितजी धिरडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तोष्णीवाल सर यांची भेट घेऊन चर्चा केली.

बालाघाट पब्लिक स्कूलमध्ये ‘अमृत वर्ग’ सुरू होणार; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणार चालना मुख्य फोटो
मुख्य फोटो

तेलगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या पुढाकारातून तेलगाव येथील बालाघाट पब्लिक स्कूलमध्ये ‘अमृत वर्ग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. सुमितजी धिरडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तोष्णीवाल सर यांची भेट घेऊन चर्चा केली. अमृत वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सकारात्मक विचार आणि संस्कारमूल्यांची रुजवणूक करण्यावर भर देण्यात येणार आहे. योग, प्राणायाम, खेळ आणि व्यक्तिमत्त्व विकासविषयक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच शाळेत दुर्गोत्सव उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम बनविण्यासोबतच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘अमृत वर्ग’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शालेय स्तरावर व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्काराधिष्ठित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 17-10-2026 News publication date | Time: 12:13 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 17-10-2026 News publication date | Time: 12:13 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement