डोंबिवली येथील आज अमृत संस्थेच्या वतीने स.वा. जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नवरात्रीच्या उत्साहपूर्ण वातावरणात अमृत वर्ग प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेचे मुंबईचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेश पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
डोंबिवली येथील आज अमृत संस्थेच्या वतीने स.वा. जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नवरात्रीच्या उत्साहपूर्ण वातावरणात अमृत वर्ग प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेचे मुंबईचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेश पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यपक श्री.संजय नलावडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत वर्ग उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना अमृत वर्गाची संकल्पना, विविध उपक्रम तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकडून अमृत वर्गातील उपक्रमांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. अमृत वर्गातील प्रमुख उपक्रम : प्रार्थना * शीतलीकरण * बैठकीचे खेळ * आज्ञा अभ्यास * मैदानी खेळ * कृतीयुक्त गीते * प्रेरणादायी गोष्टी * राष्ट्रीय घोषणा * कल्याण मंत्र नवरात्रीच्या मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रशिक्षणाची सुरुवात आनंददायी व प्रेरणादायी झाली. एकूण २५०/३०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी अमृत संस्थेच्या उपजिल्हा व्यवस्थापिका माया रत्नपारखी-खेत्रे उपस्थित होत्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment