सेवा संकल्प अभियानांतर्गत यवतमाळ येथील महिला विद्यालयात आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

यवतमाळ, दि. १७ ऑक्टोबर २०२६ येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिला विद्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत यवतमाळ येथील महिला विद्यालयात आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न मुख्य फोटो
सेवा संकल्प अभियानांतर्गत यवतमाळ येथील महिला विद्यालयात आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न अतिरिक्त फोटो

यवतमाळ, दि. १७ ऑक्टोबर २०२६ येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिला विद्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थिनींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उपाध्ये मॅडम, पर्यवेक्षिका कुडमेथे मॅडम, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा तसेच अमृत यवतमाळ जिल्हा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. वैशाली सुश्रुत लुले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यामध्ये मुलींची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ, स्त्री आरोग्य, स्त्रीरोगविषयक समस्या आणि आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शनपर सत्र घेण्यात आले. किशोरवयीन मुलींनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व समजून घ्यावे आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, याविषयी डॉ. लुले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आरोग्यविषयक योग्य माहिती मिळावी आणि त्यांच्यामध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी निलेश टिकले सर यांनी आभार प्रदर्शन केले. अमृत यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यालयाचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 17-10-2026 News publication date | Time: 08:28 AM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 17-10-2026 News publication date | Time: 08:28 AM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement