बिरसी एअरपोर्टवर मोफत थॅलेसेमिया व सिकलसेल तपासणी शिबिर; ५४ नागरिकांनी घेतला लाभ

अन्य सामाजिक उपक्रमांतर्गत अमृतच्या पुढाकाराने बिरसी एअरपोर्ट, गोंदिया येथे मोफत थॅलेसेमिया व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी रा.स्व.स. लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समिती डायग्नोस्टिक यांचे सहकार्य लाभले.

बिरसी एअरपोर्टवर मोफत थॅलेसेमिया व सिकलसेल तपासणी शिबिर; ५४ नागरिकांनी घेतला लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

गोंदिया : अन्य सामाजिक उपक्रमांतर्गत अमृतच्या पुढाकाराने बिरसी एअरपोर्ट, गोंदिया येथे मोफत थॅलेसेमिया व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी रा.स्व.स. लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समिती डायग्नोस्टिक यांचे सहकार्य लाभले. नागरिकांमध्ये थॅलेसेमिया व सिकलसेल या आजारांविषयी जनजागृती निर्माण करण्यासोबतच त्यांना प्राथमिक तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ५४ नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री. गिरीशचंद्र वर्मा, विमानपत्तन निदेशक, बिरसी एअरपोर्ट, गोंदिया यांनी अमृतच्या पुढाकाराचे कौतुक करून आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारच्या सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. पराग अंबुले, Assistant Manager, Operations तसेच श्री. सूरज खेत, वरिष्ठ सहायक, Operations, बिरसी एअरपोर्ट, गोंदिया यांचे विशेष सहकार्य लाभले. थॅलेसेमिया व सिकलसेलसारख्या आजारांची वेळीच तपासणी, त्याबाबतची जनजागृती आणि नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक आरोग्य, जनजागृती आणि लोककल्याणाच्या दृष्टीने अमृतच्या माध्यमातून भविष्यातही अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरू राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Publisher: Pranay Nagle News publisher name | Date: 18-09-2026 News publication date | Time: 11:02 AM News publication time | Views: 180 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Pranay Nagle News publisher name | Date: 18-09-2026 News publication date | Time: 11:02 AM News publication time | Views: 180 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement