डहाणू येथील के. एल. पोंदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमांतर्गत 'स्वच्छ भारत' अभियान उत्साहात संपन्न

येथील के. एल. पोंदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 'अमृत सेवा कार्य' आणि 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमांतर्गत 'युवा भारत, स्वच्छ भारत' अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मोहिमेत कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छतेचा संदेश दिला.

डहाणू येथील के. एल. पोंदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमांतर्गत 'स्वच्छ भारत' अभियान उत्साहात संपन्न मुख्य फोटो
डहाणू येथील के. एल. पोंदा ज्युनिअर कॉलेजमध्ये 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमांतर्गत 'स्वच्छ भारत' अभियान उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी कॉलेजचा परिसर, क्रीडांगण आणि आजूबाजूच्या सार्वजनिक जागांची स्वच्छता केली. प्लास्टिक कचरा गोळा करणे, सुका व ओला कचरा वेगळा करणे आणि परिसर प्लास्टिकमुक्त करणे यावर विशेष भर देण्यात आला. केवळ स्वच्छताच नाही, तर विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' चा संदेश देऊन जनजागृती केली.

नियोजनाची प्रशंसा

कॉलेज प्रशासनाने या 'अमृत सेवा कार्याचे' अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाचे महत्त्व आणि स्वच्छतेची सवय रुजण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. या यशस्वी उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि कॉलेज प्रशासनाने सर्व युवा विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. प्राचार्य घागस मॅडम यांच्या परवानगीने झालेल्या या उपक्रमात प्राध्यापक शशिकांत चव्हाण सर व राजपूत सर उपस्थित होते.

अमृत संस्थेतर्फे अमित उदय आठवले यांनी अमृत सेवा कार्य संपन्न केले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 29-09-2026 News publication date | Time: 10:37 AM News publication time | Views: 203 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 29-09-2026 News publication date | Time: 10:37 AM News publication time | Views: 203 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Shashikant Ambadas Chavan
30-09-2026 05:41 PM

Very good program, it's need for society. Students motivate to learn value education.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement