अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अमृततर्फे शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; ४२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अमृततर्फे शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन  मुख्य फोटो
अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अमृततर्फे शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन  अतिरिक्त फोटो

शहादा, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहादा येथे अग्रवाल समाज आणि महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमात अमृत संस्थेच्या नंदुरबार कार्यालयातील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मानवसेवा, समाजहित आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुपेश अग्रवाल तसेच अग्रवाल समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी अग्रवाल समाजातील पदाधिकारी व उपस्थितांना संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि समाजातील गरजू घटकांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अग्रसेन महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे सामाजिक एकता, सेवाभाव आणि जनकल्याणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. ४२ रक्तदात्यांच्या सहभागातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, समाजहितासाठी अशा उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 01:52 PM News publication time | Views: 191 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 09-10-2026 News publication date | Time: 01:52 PM News publication time | Views: 191 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement