अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे मार्फत मोफत "आरोग्य तपासणी शिबीरराचे" आयोजन करण्यात आले

अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे मार्फत "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत मोफत "आरोग्य तपासणी शिबीरराचे" आयोजन करण्यात आले होते.

अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे मार्फत मोफत "आरोग्य तपासणी शिबीरराचे" आयोजन करण्यात आले मुख्य फोटो
अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे मार्फत मोफत "आरोग्य तपासणी शिबीरराचे" आयोजन करण्यात आले अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर :-अमृत(महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अहिल्यानगर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था व साईदीप सह्याद्री हॉस्पिटल व शिवतीर्थ मित्र मंडळ,भुतकरवाडी बालिकाश्रम रोड,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने "सेवा संकल्प अभियान"उपक्रमाअंतर्गत "सेवा माझे योगदान"(एक दिवस राष्ट्रासाठी )या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत "मोफत आरोग्य तपासणी शिबिर"आयोजित करण्यात आले होते.

हे शिबीर पुढील ठिकाण घेण्यात आले होते.शिवतीर्थ मित्र मंडळ,भारत कॉलनी,भुतकरवाडी बालिकाश्रम रोड,अहिल्यानगर-414003

आरोग्य तपासणी शिबिरा मध्ये परिसरातील 39 महिलां/पुरुष यांनी लाभ घेतला.यामध्ये साईदिप हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांचे सहकार्य लाभले.या शिबिरामध्ये सर्वांची विशेषतः रक्तदाब चाचणी व मधुमेहचाचणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी व अमृत मित्र सुजल झुंजारे यांचे सहकार्य लाभले.

अमृत संस्थे मार्फत "सेवा संकल्प अभियान" या उपक्रमा अंतर्गत अहिल्यानगर मध्ये 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधी मध्ये जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी माहिती दिली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे.


त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,हिंदू-लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 19-09-2026 News publication date | Time: 09:05 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 19-09-2026 News publication date | Time: 09:05 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement