निरोगी समाज, समृद्ध भारत!
अमृत संस्था, नांदेड कडून देगलूर येथील महाविद्यालय आणी EDP बॅच मधे मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन!
अमृत संस्थेतर्फे देगलूर येथील महाविद्यालय आणि ईडीपी बॅचमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
देगलूर: 'अमृत' संस्थेच्या "अमृत युवा ऊर्जा" या उपक्रमांतर्गत देगलूर येथील स्थानिक महाविद्यालय आणि सध्या सुरू असलेल्या अमृतच्या 'ईडीपी' (EDP) बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी लवकरच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या संदर्भात अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी देगलूर येथील आरोग्य सभापती तथा नगरसेविका सौ. रत्नमाला रमेशराव कौरवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गौळकर यांची भेट घेऊन अमृत संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व महाविद्यालयात तसेच ईडीपी बॅचमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्याबाबत अधिकृत निवेदन सादर केले.
या निवेदनावर वैद्यकीय अधिकारी डॉ. गौळकर मॅडम यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला असून, येत्या पुढील आठवड्यात हे आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल, असे सांगितले आहे.
या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि ईडीपी बॅचमधील प्रशिक्षणार्थींना मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा थेट लाभ मिळणार आहे. अमृत संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment