पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व ' पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व ' पंधरवड्या निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न..

पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व ' पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न मुख्य फोटो
पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व ' पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व' पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न.


दि. २९ रोजी पानसरे महाविद्यालय, अर्जापूर ता. बिलोली येथे आज मंगळवार दि. २९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या शाखा नांदेड यांच्या वतीने 'अमृत युवा ऊर्जा व विश्वबंधुत्व' पंधरवड्यानिमित्त 'एक दिवस राष्ट्रासाठी' या विषयावर आधारित कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुभाषराव गायकवाड हे होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री. ज्ञानेश्वर शिंदे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा व कायदा पालन अशा प्रकारचे मार्गदर्शन केले, तसेच ज्ञान व शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन केले. दुसरे अतिथी व मार्गदर्शक म्हणून माजी वैद्यकीय अधिकारी, कुंडलवाडी येथील डॉ. नरेश बोधनकर हे होते. त्यांनी मानसिक आजार तसेच नशा मुक्तीवर आधारित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नायगावचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री. लक्ष्मण बुद्धलवाड हेही उपस्थित होते. अमृत संस्था नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी आपल्या


प्रास्ताविकात अमृत संस्थेबद्दल व संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, युवक संदेश यादरम्यान श्री. विश्वेश्वर जोशी व प्रा. शिवकुमार सरकोंडावार यांनी विद्यार्थ्यांशी उत्कृष्ट संवाद साधला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रमाध्यक्षांचे स्वागत तसेच सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. बेलखेडे यांनी केले. तसेच स्टाफ सेक्रेटरी डॉ. जाधव डी. बी., उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी व स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. नारायण शिवशेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी बहुसंख्येने प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा सर्वांनी उत्स्फूर्तपणे आनंद घेतला. उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 30-09-2026 News publication date | Time: 12:06 AM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 30-09-2026 News publication date | Time: 12:06 AM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement