बार्शीच्या नवोद्योजकाला 'अमृत'चा आधार; वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून १,१५,४९८ रुपयांचा लाभ

महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नवोद्योजक श्री. अथर्व बुडूख यांना ₹१,१५,४९८ (एक लाख पंधरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये) इतका व्याज परतावा मिळाला आहे. ही रक्कम त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

बार्शीच्या नवोद्योजकाला 'अमृत'चा आधार; वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून १,१५,४९८ रुपयांचा लाभ मुख्य फोटो
बार्शीच्या नवोद्योजकाला 'अमृत'चा आधार; वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून १,१५,४९८ रुपयांचा लाभ अतिरिक्त फोटो

बार्शीच्या नवोद्योजकाला 'अमृत'चा आधार; वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून १,१५,४९८ रुपयांचा लाभ सोलापूर: महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नवोद्योजक श्री. अथर्व बुडूख यांना ₹१,१५,४९८ (एक लाख पंधरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये) इतका व्याज परतावा मिळाला आहे. ही रक्कम त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. 'अमृत' संस्थेमार्फत समाजातील पात्र घटकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी विविध योजनांद्वारे मदत केली जाते. वैयक्तिक व्याज परतावा योजनेत पात्र लाभार्थ्यांनी बँकेकडून घेतलेल्या व्यवसाय कर्जावरील व्याजाची रक्कम संस्थेकडून परत केली जाते, त्यामुळे उद्योजकांवरील आर्थिक भार कमी होऊन व्यवसाय वाढीस चालना मिळते.

लाभ मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना श्री. अथर्व बुडूख म्हणाले, "अमृत संस्थेकडून मिळालेल्या व्याज परताव्यामुळे माझ्या व्यवसायाला नवी गती मिळाली आहे. व्यवसाय वाढीसाठी ही मदत खूप उपयोगी ठरली. यासाठी मी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो."

ग्रामीण भागातील तरुणांनी स्वावलंबी होऊन रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, यासाठी 'अमृत'तर्फे पुढेही विविध योजना राबविल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा:

'अमृत' जिल्हा कार्यालय, सोलापूर पत्ता: 108 A, श्री साई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 3, तिसरा मजला, यतीराज हॉटेलच्या पुढे, ड्रायफ्रूट हाऊस आणि स्वस्तिक ज्वेलर्स च्या बोळात, सात रस्ता, मोदीखाना, सोलापूर - 413001. संपर्क क्रमांक: 9112228768 / 8669589834 / 9284483216

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: श्रेयस कुलकर्णी ,बिरुदेव वाघमोडे News publisher name | Date: 02-10-2026 News publication date | Time: 04:53 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: श्रेयस कुलकर्णी ,बिरुदेव वाघमोडे News publisher name | Date: 02-10-2026 News publication date | Time: 04:53 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement