कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अमृत दिनदर्शिकेचे उत्साहात स्वागत

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रदर्शित; सर्वांकडून कौतुक

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अमृत दिनदर्शिकेचे उत्साहात स्वागत मुख्य फोटो
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अमृत दिनदर्शिकेचे उत्साहात स्वागत अतिरिक्त फोटो

कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे कोल्हापुरात स्वागत करण्यात आले. अमृत संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, त्या दृष्टीने अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी कोल्हापुरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच सर्व शासकीय विभागांच्या कार्यालयांमध्ये अमृत दिनदर्शिका प्रदर्शित होण्यासाठी प्रयत्न केले.

जोशी यांनी सर्व अधिकाऱ्यांना भेटून दिनदर्शिका दिली आणि इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत अमृत संस्थेच्या सर्व योजनांची माहिती देऊन शासकीय विभागामार्फत अमृतच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती केली. सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अमृत संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम खूप नावीन्यपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शासनाच्या दिनदर्शिका येण्याअगोदर एका स्वायत्त संस्थेने शासकीय यंत्रणेमधून दिनदर्शिका प्रसारित करून त्यांचे वितरण अगदी नेटकेपणाने केले, याचे कौतुक सर्व स्तरातून होत होते. दिनदर्शिकेचे डिझाइन, त्यातील मजकूर आणि यामागील वरिष्ठांचा हेतू अशा सर्वच बाबींबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला.
'अमृत संस्थेचे कार्य खूप गतिमानतेने सुरू आहे. कमी कालावधीतच अमृत संस्थेने खूप मोठ्या यशाचा टप्पा गाठला आहे,' असे मत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय डॉ. अमोल येडगे यांनी व्यक्त केले. 'हा सुंदर उपक्रम आहे,' असे मनोगत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी व्यक्त केले. 'अमृत ही एक संस्था खूप चांगल्या पद्धतीने गरजू लक्ष्यित गटासाठी काम करत असेल, तर उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने आम्ही सुद्धा या संस्थेचा प्रचार-प्रसार नक्की करू,' असा विश्वास एमआयडीसी उद्योगभवनचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी व्यक्त केला. अमृत संस्थेला घराघरात पोहोचवण्यासाठी लागेल ती मदत सर्वतोपरी करू, असे आश्वासन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे व वनिता पाटील यांनी दिले.

'अमृत संस्थेची माहिती लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की मदत करू,' असे मत तहसीलदार (जिल्हाधिकारी करमणूक विभाग) तेजस्विनी पाटील व तहसीलदार नाथाजी सगट (सर्वसाधारण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय) यांनी व्यक्त केले. 'अमृत या संस्थेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लागेल ती मदत आम्ही नक्की करू,' असे मत आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातील कार्यक्रम अधिकारी (जाहिरात विभाग) प्रवीण चिपळूणकर यांनी व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 02-01-2026 News publication date | Time: 09:34 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 02-01-2026 News publication date | Time: 09:34 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words