अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी जिल्हा परिषदेतील डॉ. सोज्वल जैन, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि श्रीमती जिजा तांबोरे, कनिष्ठ सहाय्यक अधिकारी यांची भेट घेऊन ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाचं पत्र दिलं आणि सविस्तर माहिती सांगितली. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांनी सहभागी व्हावं, यासाठी उद्या पत्र काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची ओळख करून देण्याचा अमृतचा प्रयत्न आहे.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात, आपल्या इतिहासाची माहिती घ्यावी आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचं महत्त्व समजून घ्यावं, यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा उपक्रम जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक शाळांपर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभागी व्हावं, यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी जिल्हा परिषदेतील डॉ. सोज्वल जैन, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि श्रीमती जिजा तांबोरे, कनिष्ठ सहाय्यक अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाबाबतचं पत्र देऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांची ओळख व्हावी, आपल्या इतिहासाची माहिती मिळावी आणि गड-किल्ल्यांचं जतन करण्याचं महत्त्व समजावं, हा उद्देश आहे.
या भेटीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमात सहभागी होण्यासंदर्भात उद्या पत्र काढण्यात येणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची गोडी लागावी आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, यासाठी अमृतच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment