अमृत दुर्गोत्सव २०२६ साठी अमृतचा पुढाकार; शाळांपर्यंत पोहोचवणार उपक्रमाची माहिती!

‘माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्रीमती अश्विनी लाठकर मॅडम यांची भेट घेऊन दिली उपक्रमाची माहिती.

अमृत दुर्गोत्सव २०२६ साठी अमृतचा पुढाकार; शाळांपर्यंत पोहोचवणार उपक्रमाची माहिती! मुख्य फोटो
अमृत दुर्गोत्सव २०२६ साठी अमृतचा पुढाकार; शाळांपर्यंत पोहोचवणार उपक्रमाची माहिती! अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार कराव्यात, आपल्या ऐतिहासिक वारशाची माहिती घ्यावी आणि गड-किल्ल्यांचं महत्त्व समजून घ्यावं, यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावं आणि उपक्रमाची माहिती सर्व शाळांपर्यंत पोहोचावी, यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्रीमती अश्विनी लाठकर मॅडम यांची भेट घेऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

या भेटीदरम्यान ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाचा उद्देश, त्याचं महत्त्व आणि शाळांनी या उपक्रमात सहभागी होण्याची गरज याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

तसेच, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातूनही या उपक्रमाची माहिती संबंधित शाळांपर्यंत पोहोचवून त्यांचा सहभाग वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत वर्ग’ या उपक्रमाची माहितीही अक्षय लंबे यांनी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर मॅडम यांना दिली. दिवाळीच्या सुट्टीत गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये ऐतिहासिक वारशाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि गड-किल्ल्यांच्या जतनाचं महत्त्व समजावं, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 05:28 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 05:28 PM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement