अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेमुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळाल्याने त्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या व्याज परतावा योजनेचा लाभ भाळवणीच्या वासुदेव कुलकर्णी यांना मिळाला आहे. या योजनेअंतर्गत त्यांना ७७ हजार ३९९ रुपयांचा व्याज परतावा मिळाला असून, त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला आर्थिक हातभार लागला आहे. वासुदेव कुलकर्णी हे सेंद्रिय खतांचा व्यवसाय करतात. व्यवसायाची वाढ करण्याच्या उद्देशाने त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरमुळे सेंद्रिय खतांची वाहतूक करणे अधिक सोयीचे झाले असून, व्यवसायातील कामकाजाला गती मिळाली आहे.
अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेमुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा मिळाल्याने त्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार करण्यास प्रोत्साहन मिळाले असून, सेंद्रिय खतांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठीही मदत झाली आहे.
अमृत संस्थेच्या विविध योजनांमुळे लक्षित गटातील युवकांना स्वयंरोजगार व व्यवसायवृद्धीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. उद्योजकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने संस्थेच्या योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे जिल्हा व्यवस्थापकानी आवाहन केले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क :
९११२२२८७६६ /७०५७६०७४१९
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६
अमृत संस्थेविषयी :- अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी, हिंदू वीरशैव लिंगायत इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
संकेतस्थळ- https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment