महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी लक्ष्मी अर्बन बँक, लातूर शाखा माजलगाव येथील स्थानिक सल्लागार श्री. डॉ. शैलेश पाठक यांची अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. सुमित धिरडे यांनी भेट घेतली.
माजलगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी लक्ष्मी अर्बन बँक, लातूर शाखा माजलगाव येथील स्थानिक सल्लागार श्री. डॉ. शैलेश पाठक यांची अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. सुमित धिरडे यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान अमृतच्या विविध योजनांची तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी असलेल्या व्याज परतावा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अमृतच्या योजना कशा उपयुक्त ठरतात, याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. शैलेश पाठक यांनी अमृतच्या योजनांना सकारात्मक प्रतिसाद देत, पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज मंजुरीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्याबाबतही त्यांनी पुढाकार दर्शविला.
अमृतच्या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योजकतेला चालना देणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साधणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. बँक आणि अमृत यांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment