अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ चे “ पनवेल नगरीत ’’ आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मोठी संधी या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कर्तृत्वाला चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती याकरिता स्थानिक उद्योजक लक्षित गटातील विविध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी विक्री कौशल्य वाढावे याकरिता व्यवस्थापकीय संचालक अमृत यांची संकल्पना असलेली “पनवेल अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठेचे” आयोजन केले आहे

अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ चे “ पनवेल नगरीत  ’’ आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

“महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी” ( अमृत ) व “आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरात अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ चे आयोजन पनवेल शहरात संघ मित्र सोसायटी येथे संपन्न होत आहे. रायगड जिल्ह्यातील लघुउद्योजकांना व नागरिकांना विनंती आहे की आपण अमृतपेठ थेट बाजारपेठ पनवेल येथे सहकुटुंब भेट देऊन नावउद्योजकाना प्रोत्साहित करावे. महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मोठी संधी या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कर्तृत्वाला चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती याकरिता स्थानिक उद्योजक लक्षित गटातील विविध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी विक्री कौशल्य वाढावे याकरिता व्यवस्थापकीय संचालक अमृत यांची संकल्पना असलेली “पनवेल अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठेचे” आयोजन केले आहे. संघमित्र सोसायटी,पनवेल, जिल्हा रायगड येथे अमृत पेठ शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर होणार आहे. सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली असणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: रायगड जिल्हा व्यवस्थापक -9112228759

श्री शैलेश मराठे - 9423892182

कु मंगेश ढेबे - 8149552143

सौ. सुवर्णा तोंडूलकर 9820923312


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 02:00 PM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 02:00 PM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement