अमृतच्या व्याज परतावा योजनेतून कळंब(जि.धाराशिव) येथील दत्तप्रसाद रामेश्वर रांदड यांना ८५ हजार ५४४ रुपयांचा लाभ!

कळंब येथील दत्तप्रसाद रामेश्वर रांदड यांना अमृतच्या योजनेचा लाभ; व्यवसायवृद्धीसाठी मिळाले आर्थिक पाठबळ

अमृतच्या व्याज परतावा योजनेतून कळंब(जि.धाराशिव) येथील दत्तप्रसाद रामेश्वर रांदड यांना ८५ हजार ५४४ रुपयांचा लाभ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

कळंब, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेंतर्गत कळंब येथील श्री.दत्तप्रसाद रामेश्वर रांदड यांना ८५ हजार ५४४ रुपयांचा व्याज परतावा जमा झाला आहे. अमृतच्या या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून, स्वयंरोजगार आणि व्यवसायवृद्धीला प्रोत्साहन मिळत आहे. कळंब येथील गांधी नगर परिसरात व्यवसाय करणाऱ्या श्री. दत्तप्रसाद रामेश्वर रांदड यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकेकडून घेतलेल्या व्यवसाय कर्जावरील व्याजाची रक्कम नियमानुसार परत केली जाते. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होते. आजच्या काळात स्वतःचा व्यवसाय उभारणे आणि तो यशस्वीपणे चालविणे हे अनेक युवकांसमोर मोठे आव्हान आहे. व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे उद्योजकतेच्या संधी मर्यादित राहू नयेत, या दृष्टीने अमृत संस्थेच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. व्याज परतावा योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळत असून, त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. अमृत संस्थेचा उद्देश केवळ आर्थिक सहाय्य देणे नसून, पात्र घटकांमधील युवक-युवतींना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्यामध्ये उद्योजकतेची भावना विकसित करणे हा आहे. विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. श्री. दत्तप्रसाद रामेश्वर रांदड यांना मिळालेला ८५ हजार ५४४ रुपयांचा व्याज परतावा हा अमृतच्या योजनांमधून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचे उदाहरण आहे. पात्र लाभार्थ्यांनी अमृतच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 02:00 PM News publication time | Views: 439 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 16-10-2026 News publication date | Time: 02:00 PM News publication time | Views: 439 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement