अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून शेवगाव मधील प्रिया बाहेती यांना मिळाले आर्थिक पाठबळ

अहिल्यानगर मधील शेवगाव येथील प्रिया बाहेती यांना अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजने मुळे मिळाले आर्थिक पाठबळ.

अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून शेवगाव मधील प्रिया बाहेती  यांना मिळाले आर्थिक पाठबळ मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर मधील शेवगाव तालुक्यातील प्रिया बाहेती यांना अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 23183 /- पर्यंतचा व्याज परतावा मिळाला आहे. प्रिया बाहेती यांचा "आईसक्रीम अँड अमूल प्रॉडक्ट एजन्सी" चा व्यवसाय आहे.

या व्यवसायासाठी त्यांनी आय.डी.बी.आय.बँक येथून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरल्यानंतर त्यांना अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेतून हा लाभ मिळाला आहे.

प्रिया बाहेती यांना या योजनेमुळे आर्थिक हातभार मिळाला असून, व्यवसायाच्या वाटचालीत अमृत संस्थेचि मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्याज परतावा चा लाभ मिळाल्यानंतर प्रिया बाहेती यांनी अमृत संस्थेचे आभार मानले तसेच अमृतसंस्थे मुळे आर्थिक मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करत, अशा योजनांचा लाभ मिळणे लाभार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा.विजय जोशी सर यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्रभर अमृत संस्थेचे कार्य योग्यरित्या चालू आहे.

अमृत स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून विविध आर्थिक, शैक्षणिक व कौशल्यविकास योजनांचा लाभ लक्षित गटातील नागरिकांना दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत, हिंदू लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता :- अमृत,वरुण अपार्टमेंट,आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 08:28 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 08:28 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement