बीड जिल्हा संघचालक श्री प्रकाशजी तोष्णीवाल यांना अमृतच्या विविध योजनांची माहिती

अमृतच्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा संघचालक श्री प्रकाशजी तोष्णीवाल यांची सदिच्छा भेट

बीड जिल्हा संघचालक श्री प्रकाशजी तोष्णीवाल यांना अमृतच्या विविध योजनांची माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

माजलगाव:जिल्हा संघचालक श्री प्रकाशजी तोष्णीवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री चिंतेश जोशी यांनी अमृतच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये व्याज परतावा योजना, स्वयंरोजगार व उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजना, तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश होता. या योजनांच्या माध्यमातून पात्र युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अमृत कार्यरत असल्याचे श्री चिंतेश जोशी यांनी सांगितले. अमृतच्या विविध योजनांची माहिती समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता. याप्रसंगी अमृत मित्र श्री सुमितजी धिरडे उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 06:01 PM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 06:01 PM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement