अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे मा.श्री शिरीष भालेकर(अनुलोम पुणे विभाग भाग जनसेवक) यांनी सदिच्छा भेट दिली.
अहिल्यानगर :- अमृत कार्यालय येथे मा.श्री शिरीष भालेकर-अनुलोम पुणे विभाग भाग जनसेवक यांनी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भेट दिली. जिल्हा व्यवस्थाक सागर भोपे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी मा. दिपक रोहकले-दक्षिण जिल्हा भाग जनसेवक,श्री अमोल अवस्थी-शहर भाग जनसेवक, श्री राम भालसिंग-श्रीगोंदा भाग जनसेवक, श्री प्रसाद तोटे-पारनेर भाग जनसेवक व श्री पृथ्वीराज तांबे-राहुरी भाग जनसेवक हे ही उपस्थित होते.अमृत संस्थेच्या योजना लक्षित गटापर्यंत पोहचवीण्यासाठी अनुलोम भाग जनसेवक हे नेहमी सहकार्य करत असतात.
सामाजिक कार्य करत असताना अमृत संस्था अनुलोम भाग जनसेवक यांना नेहमी सहकार्य करत राहणार याविषयी सकारात्मक चर्चा झाली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत, हिंदू लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता :- अमृत,वरुण अपार्टमेंट,आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment