अमृतच्या व्याज परतावा योजनेतून छत्रपती संभाजीनगरच्या सौ. मयुरी राहुल व्यवहारे यांना ८०,३२५ रुपयांचा लाभ

अमृतच्या व्याज परतावा योजनेतून मयुरी राहुल व्यवहारे यांना ८०,३२५ रुपयांचा लाभ मिळाला. ‘रेणुका साडी सेंटर’ या व्यवसायाच्या वाढीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची परताव्याची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संस्थेचे आणि जिल्हा टीमचे आभार मानले. तसेच पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अमृतच्या व्याज परतावा योजनेतून छत्रपती संभाजीनगरच्या सौ. मयुरी राहुल  व्यवहारे यांना ८०,३२५ रुपयांचा लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या व्याज परतावा योजनेतून मयुरी राहुल व्यवहारे यांना ८०,३२५ रुपयांचा लाभ मिळाला आहे.

मयुरी राहुल व्यवहारे यांचे ‘रेणुका साडी सेंटर’आहे . व्यवसायासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यात ८०,३२५ रुपयांची व्याज परताव्याची रक्कम जमा झाली आहे. या लाभामुळे त्यांना व्यवसायाच्या वाढीसाठी आर्थिक दिलासा मिळाला आहे.

व्याज परताव्याचा लाभ मिळाल्यानंतर मयुरी राहुल व्यवहारे यांनी अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अमृत संस्थेचे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमचे आभार मानले.

अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेमुळे उद्योजकांना आर्थिक मदत मिळत असून, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मयुरी राहुल व्यवहारे यांनी केले.

अमृत संस्थेच्या विविध योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना व्यवसायवृद्धीची संधी मिळत असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 03:14 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 15-10-2026 News publication date | Time: 03:14 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement