"अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रशिक्षणांचा पात्र युवक-युवती,लघु उद्योजक आणि व्यावसायिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे केले आवाहन."
परभणी:अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा प्रत्यक्ष लाभ परभणी येथील स्थानिक उद्योजक अजय हमदापूरकर यांना मिळाला आहे. या योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक परताव्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या विस्ताराला मोठा दिलासा मिळाला आहे. 'मुक्ता ॲग्रो एजन्सी' चे संचालक अजय हमदापूरकर यांचा ठिबक सिंचन, स्प्रिंकलर व इतर आधुनिक कृषी साहित्याच्या विक्रीचा व्यवसाय आहे. आपल्या या व्यवसायाचा अधिक विस्तार करण्यासाठी त्यांनी बँकेकडून व्यावसायिक कर्ज घेतले होते. या कर्जावरील व्याजाचा परतावा अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा झाला आहे.सदर योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना हमदापूरकर यांनी, "बँकेच्या कर्जावरील व्याज परतावा वेळेत मिळाल्यामुळे व्यवसायाची आर्थिक घडी बसवण्यास मोठी मदत झाली आहे," असे सांगत अमृत संस्था व परभणी जिल्हा टीमचे विशेष आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment